Japan's Twitter killer sentenced to death

जपानच्या ‘ट्विटर किलर’ ला मृत्यूदंडाची शिक्षा, नऊ खून केल्याची कबुली

ग्लोबल

टोकियो : जपानमध्ये ट्विटर किलिंगच्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. टोकियो जिल्हा न्यायालयाने मंगळवारी ‘ट्विटर किलर’ ला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. हा किलर आत्महत्या करण्याचा विचार असल्याच्या पोस्ट टाकणाऱ्या तरुणांशी संपर्क साधायचा आणि त्यांचा खून करायचा. ताकाहिरो शिराईसी असं या ट्विटर किलरचं नाव असून तो 30 वर्षाचा आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

टोकियोच्या जिल्हा न्यायालयाने त्याला खून करणे, मृतदेहाचे तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवणे या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ट्विटर किलरने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व गुन्हे मान्य केले आहेत. ताकाहिरो शिराईसीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं होतं की, “आपल्या अशिलाने मृत लोकांच्या संमतीने त्यांचा खून केला आहे. त्यामुळे या कायद्यांतर्गत त्याच्यावर खटला चालवण्यात यावा.” न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळली होती.

सरकारच्या वतीनं केस लढणाऱ्या वकिलांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. संबंधित आरोपीने त्याच्यावर ठेवण्यात आलेले सर्व आरोप मान्य केल्याने न्यायालयाने त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सोशल मीडियावर आपण आत्महत्या करणार असल्याच्या पोस्ट टाकणाऱ्या 15 ते 26 वयाच्या तरुणांच्या शोधात ताकाहिरो शिराईसी असायचा. त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याही मनात आत्महत्येचे विचार येत असून मी आपल्याला आत्महत्या करायला मदत करतो असं सांगायचा. जपानी भाषेत हॅंगमॅन असे नाव असलेल्या आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून संबंधित तरुणांना तो आपल्या घरी बोलवायचा आणि त्यांचा खून करायचा. नंतर त्या मृतदेहाचे तुकडे करुन ते फ्रिजमध्ये टाकायचा. अशा प्रकारचे नऊ खून केल्याचं आरोपीनं न्यायालयात कबुल केलं आहे.

टोकियो मध्ये एक 23 वर्षीय महिला गायब झाल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्या महिलेच्या शोधात ऑक्टोबर 2017 मध्ये पोलीस ताकाहिरो शिराईसी याच्या घरी पोहचले. तिथं त्यांना अनेक फ्रिजमध्ये मृतदेह ठेवल्याचं आढळलं. या खून प्रकरणामुळे जपानमध्ये खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर जपान सरकारने आणि सोशल नेटवर्किंग साइट्सनी आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या अशा प्रकारच्या तरुणांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरु केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत