Gold will be given as a gift at a girl's wedding

वाह! ‘या’ राज्यात मुलीच्या लग्नात भेट म्हणून मिळणार एक तोळं सोनं

देश

आसाम सरकारने राज्यातील मुलींच्या लग्नात एक तोळं सोनं देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अरुंधती गोल्ड योजने’ च्या माध्यमातून आई-वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नात मोफत एक तोळं सोनं देण्यात येणार आहे. ‘अरुंधती गोल्ड योजने’ च्या माध्यमातून राज्यातील मुलींच्या लग्नात 10 ग्रॅमचा सोन्याचा शिक्का मोफत भेट म्हणून देण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारनं घेतला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अरुंधती गोल्ड योजनेच्या माध्यमातून आसाम सरकार राज्यातील ज्या परिवारांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे अशा परिवारांना 10 ग्रॅम सोन्याचा शिक्का देणार आहे. परिवारातील पहिल्या दोन अपत्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अरुंधती गोल्ड योजनेच्या माध्यमातून विवाहाच्या नोंदणीकरणानंतर प्रत्येक विवाह झालेली मुलगी राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या या 10 ग्रॅम सोन्यच्या शिक्क्याचा लाभ घेऊ शकते. या योजनेमुळे राज्यातील मुलींना काही प्रमाणात आर्थिक सुरक्षा मिळण्याची आशा राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्पेशल मॅरेज अॅक्ट,1954 या कायद्यानुसार नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीच्या दिवशीच संबंधित मुलगी अरुंधती गोल्ड योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज करु शकते. यासाठी मुलीचं वय किमान 18 वर्षे तर मुलाचं वय किमान 21 वर्षे असायला हवं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत