Man Drowns
महाराष्ट्र

युवक आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला आणि अनर्थ घडला…

गडचिरोली : एका २५ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (१८ मे) संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास प्राणहिता नदीच्या घाटावर घडली. तो मित्रांसोबत आंघोळीसाठी प्राणहिता नदीपात्रात गेला होता. राहुल नारायण सोयाम (२५) रा.जिमलगट्टा, ता. अहेरी असे मृतक युवकाचे नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राहुल नारायण सोयाम हा युवक आपल्या पत्नीसह सिरोंचा येथे राहात होता. तो सिरोंचा येथे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. काल सायंकाळी तो त्याच्या मित्रांसोबत प्राणहिता नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. तो पाण्यात अंघोळ करण्यासाठी उतरला मात्र, त्यानंतर तो परत आलाच नाही. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम राबवली तेव्हा राहुलचा मृतदेह हाती लागला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात काल दिवसभरात चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. काल दुपारी १२ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील वाघोली घाटावर नाव पाण्यात उलटून सोनी मुखरू शेंडे, समृद्धी ढिवरू शेंडे आणि पल्लवी रमेश भोयर या तीन अल्पवयीन मुलींचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर जिल्ह्याच्या दुसऱ्या भागातील सिरोंचा तालुक्यातील २५ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली.

धक्कादायक : रुग्णालयात उंदराने कुरतडला 19 दिवसांच्या बाळाचा पाय

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर कोणाचा दबाव? ‘त्या’ कथित गोळीबार प्रकरणाचं पुढे काय?

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत