Approval in principle to set up a welfare board for unorganized drivers in the state

राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास तत्वत: मंजुरी

महाराष्ट्र

मुंबई : राज्यातील ऑटोरिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक यासारख्या असंघटित वाहनचालकांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मंजुरी दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यात असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन करण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, असंघटित विकास आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर आदी उपस्थित होते.

असंघटित वाहनचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी संबंधित विभागांकडून प्रस्ताव सादर करण्याबाबत तसेच यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याबाबतच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित विभागाला यावेळी दिल्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत