Salary of central employees doing work from home will not be deducted, Modi government's decision
अर्थकारण देश

केंदीय कर्मचाऱ्यांना मिळाले मोठे गिफ्ट, महागाई भत्त्यात पुन्हा वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्यासाठी दिवाळी भेट म्हणून महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

DA मध्ये आणखी 3 टक्क्यांची वाढ म्हणजे आता महागाई भत्ता (DA) 31 टक्के होईल. 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या वाढीचा थेट लाभ मिळेल. यापूर्वी यावर्षी जुलैमध्येच सरकारने महागाई भत्ता (डीए वाढ) 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के केली होती. यापूर्वी 17 टक्के दराने डीए देण्यात येत होता.

कामगार मंत्रालयाने AICPI (अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक) च्या गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी जाहीर केली होती. यामध्ये जून, जुलै आणि ऑगस्टच्या आकड्यांचा समावेश होता. ऑगस्टमध्ये AICPI निर्देशांक 123 अंकांवर पोहोचला आहे. यावरूनच संकेत मिळाला की सरकार महागाई भत्त्यामध्ये आणखी वाढ करू शकते. याच आधारावर, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरविला जातो.

महागाई भत्त्यात वाढ झाल्याने इतर भत्तेही वाढतील. यात प्रवास भत्ता आणि शहर भत्ता यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्तीसाठी भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमध्ये वाढ होईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत