Rekha jare bal bothe love Angel murder case Charge sheet File
अहिल्यानगर महाराष्ट्र

रेखा जरे हत्याप्रकरणात वेगळाच अँगल आला समोर, बदनामी टाळण्यासाठी हत्या, दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं आहे. बाळ बोठेसह सात आरोपींविरोधात साडे चारशे पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या दोषारोप पत्रात एक वेगळाच अँगल समोर आला आहे. त्यानुसार, रेखा जरे आणि बाळ बोठे यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून ही हत्या करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बाळ बोठे आणि रेखा जरे यांचे खूप दिवस प्रेमप्रकरण सुरु होते. मात्र, नंतर त्यांच्यात वाद सुरु झाले होते. वादांचे रूपांतर नंतर भांडणात आणि धमक्यांमध्ये झाले. त्यामुळे हे प्रकरण समोर येऊन बदनामी होऊ नये, म्हणून बाळ बोठे याने रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली, असं पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटलं आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी डीवायएसपी अजित पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

रेखा जरे हत्या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार, कारागृहात केले असे काही…

दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं असून त्यात बाळ बोठेविरोधात कट रचून खून करणे आणि त्याचे साथीदार महेश तनपुरे, अकुला चंद्रप्पा, राजशेखर चाकली, पी व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल अली आणि अब्दुल अरिफ यांच्यावर बाळ बोठेला फरार होण्यास मदत करणं या कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत