Rekha Jare's murder case: District Sessions Court rejects Bal Bothe's pre-arrest bail
अहिल्यानगर महाराष्ट्र

रेखा जरे हत्या प्रकरणातील सूत्रधार बाळ बोठेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार, कारागृहात केले असे काही…

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे सध्या कारागृहात आहे. पण कारागृहातच बाळ बोठे याने असे काही केले आहे की त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारागृहात बोठेने मोबाईलचा वापर केल्याचं उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिने फरार होता. तो वेषांतर करून वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत होता. पोलिसांनी अथक प्रयत्नाने त्याला मार्च महिन्यात हैदराबादमधून अटक केली होती. पारनेर कारागृहात काही दिवसांपूर्वी पोलिसांना मोबाईल सापडले होते. त्या प्रकरणी चौकशी केली असता कैदी बाळ बोठेने देखील मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने त्यांची हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी रेखा जरे यांची आई आणि मुलगा रुणाल गाडीत बसलेले होते. त्यांच्या मुलाने मारेकऱ्यांना पाहिले होते. पोलिसांनी त्याच्या मदतीने पाच आरोपींना ताब्यात घेतले. मात्र या आरोपींनी चौकशीत या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचं सांगितलं होतं. बाळ बोठेने सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याची माहिती आरोपींनी दिली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत