Sharad Pawar's name for UPA presidency is a plan to end Congress - Sanjay Nirupam
महाराष्ट्र राजकारण

हा तर राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग – संजय निरुपम

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए) अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडं सोपवलं जाणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत. याबाबत काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘यूपीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव चर्चेत येणं हा राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग आहे,’ असा खळबळजनक आरोप निरुपम यांनी केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद दिलं जाणार असल्याची चर्चा अचानक राजकीय वर्तुळात सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं ही चर्चा निरर्थक असल्याचं आणि देशात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात असल्याचं सांगितलं होतं. त्यातच आता संजय निरुपम यांनी यामागे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

संजय निरुपम यांनी ट्वीट करत म्हटलं कि, ‘शरद पवार यांच्याबद्दल सध्या सुरू असलेली चर्चा हा मुंबईपासून दिल्लीपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत २३ जणांच्या सह्या असलेलं पत्र सोनिया गांधी यांना लिहिण्यात आलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याचा अभाव असल्याचा शोध लावण्यात आला होता. हा काँग्रेसला संपवण्याचाच एक मोठा प्लॅन आहे.’

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत