Cricketer Bhuvneshwar Kumar's Father Dies In Meerut
क्रीडा

ब्रेकिंग : क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे निधन

मीरत (उत्तर प्रदेश) : क्रिकेटपटू भुवनेश्वर कुमारच्या वडिलांचे निधन झाले आहे. भुवनेश्वरचे वडील किरणपाल सिंग हे यकृताच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्यांच्यावर सर्व प्रकारचे इलाज करून देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले होते. कुटुंबीयांनी त्यांना गंगानगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

किरणपाल गेल्या अनेक महिन्यांपासून यकृताच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स आणि नोएडा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. इंग्लंडमधील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार चालू होते. अगदी गंभीर परिस्थितीतही किरणपाल यांनी भुवीला ‘आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ’ मध्ये वोट द्या, असं आवाहन केलं होतं. भुवी सर्वाधिक मताधिक्याने प्लेअर ऑफ दि मंथ म्हणून निवडूनही आला होता. हे पाहून त्याचे वडील खूप खूश झाले होते.

त्यांची केमो थेरपी दिल्ली आणि नोएडा येथे पूर्ण झाली होती. त्यानंतर त्यांना बरे वाटू लागले. पण दोन आठवड्यांपूर्वी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली. त्यांना गंगानगरमधील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती स्थिर राहिल्यानंतर काही दिवसांनंतर त्यांना मुजफ्फरनगर भागातील मसूरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यकृत रोगामुळे त्यांना कावीळ आणि इतर बर्‍याच आजारांनी ग्रासले होते. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्यावर भुवनेश्वर, त्याची आई इंद्रेश देवी आणि बहीण रेखा त्यांची घरीच सेवा करत होते. आज त्यांचे निधन झाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत