Only Covid Testing Lab Destroyed In Israeli Strikes
ग्लोबल

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझातील एकमेव कोरोना चाचणी लॅब उद्धवस्त

गाझा : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यान असलेला तणाव चिघळत चालला आहे. हमासकडून रॉकेट हल्ले सुरु असून इस्रायलकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत. दरम्यान इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा शहरातील एकमेव कोरोना चाचणी प्रयोगशाळा उद्धवस्त झाली आहे. या हल्ल्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इस्रायलच्या हल्ल्यात कोरोना चाचणी प्रयोग शाळा उद्धवस्त झाली आहे. गाझामधील अल-रिमल क्लिनिकच्या इमारतीचा एक भाग इस्रायलच्या हवाई हल्ल्यात कोसळला. त्याशिवाय आरोग्य मंत्रालय आणि कतारच्या रेड क्रेसेंटच्या कार्यालयाचेही नुकसान झाले आहे. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अशरफ किदरा यांनी सांगितले की, इस्रायली हल्ल्यामुळे पॅलेस्टाइनच्या आरोग्य मंत्रालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे. कोरोनाची महासाथ सुरू असताना कोरोना चाचणी लॅबचे नुकसान होणे हा मोठा धक्का असल्याचे त्यांनी सांगितले. या लॅबमध्ये दररोज १६०० जणांची कोरोना चाचणी करण्यात येत होती.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्याचा फटका सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यात २१३ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. यामध्ये ६१ लहान मुलांचा समावेश आहे. तर, १४०० हून अधिक जखमी झाले आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत दूरध्वनीवरून संवाद साधताना आपला इस्रायलला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. हमासकडून होत असलेल्या रॉकेटच्या बेछूट माऱ्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याचा इस्रायलला हक्क आहे, अशी भूमिका अमेरिकेने घेतली. तसेच, निष्पाप नागरिकांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास इस्रायलला प्रोत्साहन दिले, अशी माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली.

व्हाइट हाऊसच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, जातीयवादी हिंसाचार थांबवण्यासाठी आणि जेरुसलेम येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बायडेन यांनी पाठिंबा दिला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत