सुशांतसिंग राजपूत प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रियाला पाच वर्षांचे इनकम टॅक्स रिटर्न दाखवायला सांगितले होते. त्यात ईडीला अनेक गोष्टींमध्ये त्रुटी असल्याचं दिसलं. याच गोष्टींचा तपास करण्यासाठी ईडी ने रिया चक्रवर्ती विरुद्ध तपासाचा वेग वाढविला आहे.
इनकम टॅक्स रिटर्ननुसार, २०१७-१८ मध्ये रियाचं वार्षिक उत्पन्न १८.७५ लाख व २०१८-१९ मध्ये १८.२३ लाख एवढं होतं.
ईडी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाच्या मालकीच्या दोन मालमत्तेच्या शोधात आहे. खार पूर्वेकडे असलेला फ्लॅट रियाच्या नावावर आहे. या घराची माहिती देताना रियाने ६० लाखांचे गृहकर्ज घेतल्याचे व २५ लाख रुपये मिळकतीतून दिल्याचे सांगितले.मात्र इनकम टॅक्स रिटर्नच्या डिटेलमध्ये रियाने दाखवलेल्या उत्पन्नापेक्षा गुंतवणूक मूल्य जास्त असल्याचे दिसले.
ईडीला रियाकडून तिचं उत्पन्न, खर्च आणि गुंतवणूकी संबंधीची सर्व उत्तरं हवी आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, रियाने 14 लाख रुपयांचा आयटीआर दाखल केला आहे, पण तिची गुंतवणूक त्याहून जास्त आहे…




