महाराष्ट्र राजकारण

तुम्ही जिम सुरु करा, बघू काय होतं- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

अनलॉकची प्रक्रिया सुरु असली तरी अद्याप जिम सुरु करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिलेली नाही, त्यामुळे सरकारकडे जिम पुन्हा सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरावा यासाठी जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर भेट घेतली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज ठाकरे म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं बोलणं झालं, तेही म्हणाले जिम सुरु झालं पाहिजे. आता मी सांगतो, जिम सुरु करा, ज्याला यायचं आहे, तो जिमला येईल. बघू काय होतं. किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात? केंद्राने दिलेल्या गाईडलाईन्स पाळून काळजी घ्या, असं आवाहनही त्यांनी केलं.

राज ठाकरे म्हणाले की, ‘गोल्फ आणि टेनिस यापेक्षा जास्त फिजिकल डिस्टन्स काय असू शकतो? मधू इथे आणि चंद्र तिथे. मी खेळायला सुरुवात केली आहे, काय होतंय बघूया…

जिम व्यावसायिक आणि बॉडीबिल्डर्सनी कारवाईची भीती व्यक्त केली तेव्हा राज ठाकरे म्हणाले, काय कारवाई करणार? सगळे मार्केट सुरु आहेत. हा सगळा मूर्खाचा बाजार सुरु आहे. केंद्र सरकार सांगत आहे की, जिम सुरु करा, विमानतळ सुरु करा. राज्य म्हणतयं, आम्ही नाही करणार, मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?

राज ठाकरेंनी विचारलं, जिम सुरु केल्यानंतर तुम्ही कशी काळजी घेणार? या प्रश्नावर उत्तर देत जिम व्यावसायिकांनी सांगितलं,कार्डिओ बंद करणार असून सॅनिटायझेशनही करणार आहोत. तसेच एक तासाची एक बॅच अशा पद्धतीने जिम सुरु करण्याचा मानस असल्याचं सांगितलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत