dies during corona vaccine

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी; पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस

कोरोना देश

नवी दिल्ली : मोदी सरकारनं कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे निर्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये कोरोना लसीकरण कसं केलं जाईल, तसेच याची संपूर्ण नियमावली राज्यांना पाठवली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं की, कोरोना लस आल्यानंतर ती लोकांपर्यंत कशी पोहोचवण्यात येईल, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात येणार आहे. दरम्यान, कोणत्या कोरोना लसीचा पहिला डोस भारतात देण्यात येणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु, केंद्र सरकारने कोरोनाच्या लसीकरण्याची संपूर्ण तयारी केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत