Actress V. J. Chitra's husband Hemant arrested

अभिनेत्री व्ही. जे. चित्राचा पती हेमंतला अटक

देश

चेन्नई : तामिळ अभिनेत्री व्ही.जे. चित्रा यांचे ९ डिसेंबरला निधन झाले. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या हॉटेलच्या खोलीतील बाथरूममध्ये सापडला होता. चित्राच्या आईने हेमंतने चित्राला मारल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, चित्राला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली हेमंतला अटक करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोस्टमार्टम रिपोर्टनुसार चित्राने आत्महत्या केली आहे. वृत्तानुसार, चित्राने टीव्हीवरील मालिकांमध्ये इंटिमेट सीन दिल्याने हेमंत संतप्त झाला होता. सहायक आयुक्त सुदर्शन यांनी सांगितले की टीव्हीवर चित्राने चित्रीत केलेल्या दृश्यामुळे हेमंत खूश नव्हता आणि चित्राचा मृत्यू झाला त्या दिवशी हेमंतने तिच्याशी गैरवर्तन केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, चित्रा दुपारी अडीचच्या सुमारास ईव्हीपी फिल्म सिटी येथे शूटिंगनंतर हॉटेलमध्ये परतली. हेमंत यांनी सांगितले की हॉटेलमध्ये आल्यानंतर चित्राने सांगितले की ती आंघोळीसाठी जात आहे. ती खूप वेळ बाहेर पडली नाही तसेच दरवाजा ठोठावण्यावर तिने प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर हेमंतने हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगून डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता तिचा मृतदेह छतावर लटकलेला आढळला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत