A MiG-21 plane crashes into a house in Rajasthan
देश

राजस्थानमध्ये घरावर मिग-२१ विमान कोसळलं, गच्चीवर झोपलेल्या महिलेसह दोघांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानच्या हनुमानगडमध्ये सोमवारी सकाळी मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. बहलोल नगर भागातील एका घरावर हे लढाऊ विमान कोसळले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. हे विमान उडवमारा वैमानिक सुखरूप असल्याचं पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिगने सुरतगड येथून उड्डाण केले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिग-२१ हे लढाऊ विमान कोसळण्यापूर्वी पायलट हा पॅराशूटने सुरक्षित बचावण्यात यशस्वी झाला. पण, या दुर्घटनेत महिलेसह दोघांचा नाहक बळी गेला तर काही ग्रामस्थ जखमी झाले आहेत. इतकंच नाही तर ज्या घरावर हे विमान कोसळलं ते पूर्णपणे जमिनदोस्त झालं आहे. आसपास विमानाचे काही भाग जळताना दिसत आहेत.

हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, हवाई दलाच्या सुरतगड स्थानकावरून मिग-२१ या लढाऊ विमानाने उड्डाण केले होते. टेक ऑफ केल्यानंतर लगेचच या विमानात तांत्रिक बिघाड समोर आला. पायलटने याबाबत स्टेशनला माहिती दिली. यानंतर पायलट पॅराशूट विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. मात्र, हनुमानगढ येथील सदर पोलीस स्टेशन परिसरातील एका घरावर हे विमान कोसळले. या अपघातात पायलट सुखरूप बचावला मात्र दोन ग्लामस्थांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हवाई दलाचे बचावकार्य सुरू झाले आहे. हेलिकॉप्टरमधून बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. जखमी पायलटला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत