CM Uddhav Thackray
कोरोना पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकदिवसीय पुणे दौऱ्यावर

पुण्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्तालयात आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, पुण्याचे महापालिका आयुक्त, पुण्याचे पोलिस आयुक्त, महत्त्वाचे वैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुणे शहर तसंच पुणे जिल्ह्यात कोरोना रूग्णांची दररोजची आकडेवारी प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. शहरात दररोज जवळपास दीड हजार ते दोन हजार रूग्ण वाढतायेत. दुसरीकडे कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात यावी म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाने कोरोना उपाययोजना कश्या पद्धतीने केल्या आहेत, याचा आढावा मुख्यमंत्री आज घेतील.

ससून किंवा नायडू रूग्णालयाला मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत