पुणे : पोलीस शिपायाच्या मुलीचे अपहरण करून तीन जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीचं २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता वडगाव शेरी परिसरातून अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर नेवासा परिसरात नेऊन बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची परिसरातील सागर नावाच्या तरुणाशी मैत्री होती. […]
पुणे
औंध प्रभाग समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक विजय शेवाळे यांचे निधन
पुणे : औंध प्रभाग समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक विजय बाबुराव शेवाळे (वय 61) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे महानगरपालिकेच्या क्रिडा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. शेवाळे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून काम केले आहे. मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश करीत निवडणूक लढवली होती. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या विधी […]
पुण्यात पुन्हा दिसला गवा, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
पुण्यात पुन्हा एकदा गवा दिसला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे हा गवा आढळून आला आहे. डोंगर आणि जंगल भाग जवळच असून तेथून हा गवा आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गव्याला पकडण्यासंबंधी नियोजन करत आहेत. गेल्यावेळी गव्याला पकडताना झालेल्या चुका आणि गर्दी टाळण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर […]
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आऱोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि एका महिलेविरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या दोघांविरुद्ध अमन चड्डा यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळी त्यांच्या आई, […]
खासगी इंग्रजी शाळांचे ऑनलाईन शिक्षण बंद, शाळा 100 टक्के फी वसुलीवर ठाम
पुणे : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पालक शाळांची फी भरु शकले नाहीत. त्यामुळे अनेक शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत पुण्यातील खासगी इंग्रजी शाळांचे ऑनलाईन शिक्षण 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात काहींच्या नोकऱ्या गेल्या. कुणाचा पगार कमी झाला. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरु शकले नाहीत. त्यामुळे शिक्षकांचे […]
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची (मिसिंग लिंक) मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी खोपोली ते कुसगाव नवीन मार्गिकेच्या बांधकामाची माहिती दिली. प्रकल्पाचा तपशील : मुंबई पुणे […]
सुनेच्या हत्येची सुपारी दिली, आरोपींनी केली सुपारी देणाऱ्या सासऱ्याची हत्या
मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या खूनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याला स्वतःचाच जीव गमवावा लागला. सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथे ही घटना घडली आहे. विनायक यांचा मुलगा अजित याचा विवाह झाला होता. विवाह झालेला असताना देखील अजितने कुटुंबीयांना न कळवता दोन वर्षापूर्वी […]
धक्कादायक : टीव्ही पाहण्यावरुन झालेल्या वादातून १३ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली परिसरात घडली आहे. आईने टीव्ही पाहू दिला नाही म्हणून त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रमजान अब्दुल शेख असं आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही पाहण्यावरुन झालेल्या वादाचा राग मनात धरुन रमजानने मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गळफास […]
पुण्यात भीषण अपघातात तब्बल 8 गाड्यांची एकमेकांना धडक; दोघे ठार तर 4 जण गंभीर जखमी
पुणे : पुणे शहरातील नवले पुलाजवळ आज (२९ नोव्हेंबर २०२०) सव्वासहा वाजता साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या एका टेम्पोचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात अनेक वाहने एकमेकांना धडकली. अपघातात एका मोठ्या कंटेनरने पेट घेतला. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून मुंबईला एक ट्रक मोकळा जात […]
सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली भेट, आदर पुनावाला यांनी सहकुटुंब केलं स्वागत
पुणे : कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी सहकुटुंब मोदींचं स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर पुनावालांच्या मुलाच्या पाठीवर हात ठेवत विचारपूस केली. देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान […]










