man murdered by accused who wants to kill his daughter in law
पुणे महाराष्ट्र

सुनेच्या हत्येची सुपारी दिली, आरोपींनी केली सुपारी देणाऱ्या सासऱ्याची हत्या

मुलाच्या दुसऱ्या पत्नीच्या खूनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याला स्वतःचाच जीव गमवावा लागला. सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथे ही घटना घडली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विनायक यांचा मुलगा अजित याचा विवाह झाला होता. विवाह झालेला असताना देखील अजितने कुटुंबीयांना न कळवता दोन वर्षापूर्वी प्रेम विवाह केला होता. याची माहिती वडील विनायक यांना मिळाली. त्यामुळे विनायक यांचे मुलगा अजितसोबत खटके उडायला लागले. त्यांच्यामध्ये सतत भांडणं सुरू झाली. मुलाने दुसरा विवाह केल्यामुळे हे सर्व होत असल्याचं विनायक यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्याचा कट रचला.

विनायक पानमंद यांनी आरोपी अविनाश बबन राठोड, मोहम्मद शहजाद इस्लाम आणि मोहम्मद वसीम जब्बार यांना १ लाख ३४ हजारांची सुपारी दिली. आरोपींनी खुनाचा कात रचून गोवा आणि उत्तर प्रदेश येथून दोन पिस्तुल आणली. परंतु, आरोपी घाबरत असल्यामुळे त्यांना उशीर लागत होता. दरम्यान, विनायक यांनी घाई करायला सुरुवात केली. सुनेचा खून कधी करणार? होत नसेल तर पैसे परत करा, असं म्हणत त्यांनी आरोपीकडे तगादा लावायला सुरुवात केली.

विनायक पैसे परत मागत असल्याने आरोपींनी त्यांना खेडमधील वराळे येथे बोलावून त्यांचा गळा दाबून त्यांचा खून केला. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड च्या म्हाळुंगे पोलिसांनी दोन आरोपींना पिस्तुलासह अटक केली असून, इतर एकाचा शोध पोलीस घेत आहेत. अविनाश बबन राठोड आणि मोहम्मद शहजाद इस्लाम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर, मोहम्मद वसीम जब्बार हा अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत