Former MLA Harshvardhan Jadhav arrested in Pune
पुणे महाराष्ट्र

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आऱोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि एका महिलेविरोधात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या दोघांविरुद्ध अमन चड्डा यांनी फिर्याद दिली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळी त्यांच्या आई, वडिलांना दुचाकीवरून ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. यावेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे रस्त्याच्या बाजूला एका चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला. त्यावर हर्षवर्धन जाधव आणि इशा झा यांनी अमन चड्डा आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. चड्डा यांनी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचं सांगितलं तरीही दोघांनी मारहाण चालू ठेवली. यानंतर अमन चड्डा यांनी ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत