wild bull reappeared in Pune, Forest Department officials rushed to the spot

पुण्यात पुन्हा दिसला गवा, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

पुणे महाराष्ट्र

पुण्यात पुन्हा एकदा गवा दिसला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे हा गवा आढळून आला आहे. डोंगर आणि जंगल भाग जवळच असून तेथून हा गवा आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गव्याला पकडण्यासंबंधी नियोजन करत आहेत. गेल्यावेळी गव्याला पकडताना झालेल्या चुका आणि गर्दी टाळण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर आहे. त्यामुळे यावेळी नियोजन करून अतिशय काळजीपूर्वक ही परिस्थिती हाताळण्याचे वनविभागाचे प्रयत्न राहतील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत