Excellent tourism facilities should be created in Dajipur Sanctuary - Chief Minister Uddhav Thackeray
महाराष्ट्र मुंबई

आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रो चाचण्या पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची मेट्रो मार्गिका कुलाबा ते सीप्झ साठीच्या मेट्रो रेल्वेची डब्यांची मरोळ मरोशी येथे चाचणी करण्यात येणार आहे. आरेतील राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या त्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी करण्यात येणार असून आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सध्या मरोळ मरोशी या रस्त्याच्या भुयारी मार्गाचे काम चालू असून या कामाच्या जवळच रॅम्प बनवून काम हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चाचणीच्या कामाकरिता कोणतेही झाड तोडण्यात येणार नाही. मुंबई येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी कुलाबा ते सीप्झ या मार्गावर मेट्रो लाईन-३ चे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गिकेकरिता अल्स्टॉम या कंपनीने श्रीसिटी आंध्रप्रदेश येथे ८ डब्यांची ट्रेन तयार केलेली आहे. या गाडीची त्या ठिकाणी तांत्रिक चाचणी झालेली आहे. आता प्रत्यक्षात याची चाचणी मुंबई येथे १० हजार किमी चालवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर कुलाबा ते सीप्झ या मार्गिकेवर देखील ट्रेन चालविण्यात येणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अशा पद्धतीच्या ३१ ट्रेन या मार्गावर धावण्याकरिता उपलब्ध होणार आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत