मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची मेट्रो मार्गिका कुलाबा ते सीप्झ साठीच्या मेट्रो रेल्वेची डब्यांची मरोळ मरोशी येथे चाचणी करण्यात येणार आहे. आरेतील राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या त्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी करण्यात येणार असून आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. […]

