कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. अद्यापही हा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर भाष्य करत म्हटलं कि, राजकीय अजेंडे पुढे नेण्यासाठी देशद्रोही पत्रकार सुपारीबाज कलावंताच्या राज्यद्रोहास पाठिंबा देतात हीसुद्धा ‘हरामखोरीच’ म्हणजे मातीशी बेइमानीच आहे. काय आहे अग्रलेखात ? मुंबई कुणाची? हा प्रश्नच कुणी विचारू […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडून देखील पोलिसांचा अपमान झाला होता…
विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात सध्या मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांकडून देखील अशाच प्रकारे पोलिसांचा अपमान झाल्याचं फडणवीस यांनी सभागृहात म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, ‘कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांबाबत जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेधच आहे. तिचं […]
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम 273 अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला आहे. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच इतर नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान […]
मुंबई महापालिकेनं कंगनाचं कार्यालय केलं सील, नोटीस लावून तिला दिले ‘हे’ आदेश
अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या कार्यालयात अनधिकृतपणे बांधकाम केल्याचे सांगत महापालिकेने तिला नोटीस बजावली असून तिचं कार्यालय सील केलं आहे. तसेच येत्या २४ तासांत कार्यालयातील बांधकामासंदर्भात घेण्यात आलेल्या परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही कंगनाला देण्यात आले आहेत. त्याबाबत नोटीस देखील कार्यालयाबाहेर लावण्यात आली आहे. कंगनाने ट्वीटवरुन माहिती दिली की, तिच्या मुंबईतील ऑफिसमध्ये बीएमसीची टीम पोहचली आहे. […]
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड
महाविकास आघाडीकडून विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी नीलम गोऱ्हे तर भाजपाकडून भाई गिरकर यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर एकमतानं नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. दरम्यान, उपसभापती निवडणुकीच्या वेळी भाजपानं सभात्याग केला. निवडणुकीपूर्वी भाजपानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, याबाबतचा निकाल गुरूवारी न्यायालय देणार […]
राज्यातील वैद्यकीय प्रवेशातील प्रादेशिक आरक्षणाची ७०:३० कोटा पद्धत रद्द
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत यासंबंधी घोषणा केली. राज्यातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांचे मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे वर्गीकरण करून या अभ्यासक्रमांसाठी स्थानिक विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवण्यात येतात. त्यानुसार ज्या भागांतील वैद्यकीय महाविद्यालय असेल तेथील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के […]
उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी म्हणून विरार रेल्वे स्थानकात आंदोलन
उपनगरीय रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. त्यामुळे खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी बसेसमधून मुंबईला जावे लागते. मात्र या बसेसची संख्या कमी असून कार्यालयात पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हजारो प्रवासी विरार रेल्वे स्थानक परिसरात जमा झाले आणि रुळांवर उतरले. उपनगरीय रेल्वे सुरू करा… अशी मागणी करत त्यांनी […]
व्यवसाय बाजूला ठेवा आणि वीज बिलाबाबत मार्ग काढा- राज ठाकरेंनी दिल्या ‘अदानी ग्रुप’ला सूचना
वाढीव वीज बिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर ‘अदानी ग्रुप’च्या सीईओनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘कृष्णकुंज’ येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर वीज वितरण कंपन्यांनी राज्यातील ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं पाठवली. जनतेचा आक्रोश वाढत जाईल. जनतेला वीज बिलात सूट द्या, जनक्षोभ झाल्यास मनसे सामान्य नागरिकांच्या बाजूने असेल, असा इशारा […]
रियाची कबुली अंमली पदार्थ खरेदी केले; सेवन केले नाही
मुंबई : रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितले, या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर […]
शिर्डी संस्थानमधील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे समितीचे दुर्लक्ष, राधाकृष्ण विखे यांनी दिला आंदोलनाचा इशारा
अहमदनगर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च पासून शिर्डी साई मंदिर बंद ठेवण्यात आले असून मंदिरात येणाऱ्या दानाला मोठा फटका बसल्याने अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली. यातील अनेक कर्मचारी कोरोनाच्या संकटात नर्सिंग स्टाफमध्ये कार्यरत असताना त्यांच्याही पगारात कपात करण्यात आलीय. वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने आज भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामगारांची बैठक […]










