mumbai railway
मुंबई

उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी म्हणून विरार रेल्वे स्थानकात आंदोलन

उपनगरीय रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. त्यामुळे खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी बसेसमधून मुंबईला जावे लागते. मात्र या बसेसची संख्या कमी असून कार्यालयात पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हजारो प्रवासी विरार रेल्वे स्थानक परिसरात जमा झाले आणि रुळांवर उतरले. उपनगरीय रेल्वे सुरू करा… अशी मागणी करत त्यांनी घोषणा दिल्या. काही वेळाने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एसटी बसेसची संख्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांचे हाल होतात. तसेच महामार्गाला वळसा घालून मुंबईत जावे लागते. वाहतूक कोंडी आणि लांबंचे अतंर यामुळे कार्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही, कार्यालयात उशिरा आल्यावर पगार कापला जातो, असे आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी सांगितले. बसेसमध्ये गर्दी असल्याने करोना संसंर्गाचाही धोका असतो, असेही आंदोलक प्रवाशांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत