मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोलीला समन्स बजावले आहेत. कंगनाला 10 नोव्हेंबर रोजी तर, रंगोलीला 11 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर रहायचे आहे. कंगनावर वादग्रस्त वक्तव्ये करुन समाजामध्ये तेढ […]
महाराष्ट्र
Stay updated with the latest news from Maharashtra. Our Maharashtra News section covers local events, state politics, government decisions, social issues, and all the important happenings that impact the people of Maharashtra.
मराठा आरक्षण : राज्य शासनाच्या घटनापीठ स्थापन करण्याच्या अर्जावर लवकरच निर्णय
मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधीशांनी हे सांगितल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० […]
अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. […]
विद्यार्थ्यांची भावनिक समृध्दी वाढविण्यासाठी आयआयटी मुंबईने सुरु केले स्व-मदत संकेतस्थळ
मुंबई : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री श्री. संजय धोत्रे यांनी आज सकाळी 11 वाजता आयआयटी मुंबईने आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या बंधू- स्वमदत गट संकेतस्थळाचे उद्घाटन, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशिष चौधरी यांच्या उपस्थितीत केले. आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करताना मंत्री महोदय म्हणाले,”चांगली शैक्षणिक संस्था म्हणजे जेथे प्रत्येक विद्यार्थ्याला आपले स्वागत होत आहे आणि […]
पुण्यातील आंबेगाव येथील कचरा प्रकल्पास आग लावली कि लागली? जाणून घ्या…
पुणे : आंबेगाव येथील कचरा प्रकल्पामध्ये स्थानिक नागरिक व राजकीय व्यक्तींनी आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तसेच कार्यालयातील कॉम्प्युटर, टीव्ही, खुर्च्या, काचेच्या खिडक्या व फर्निचरचे तोडफोड करून मोठे नुकसान केले. ही घटना रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांसह पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी उशीरापर्यंत प्रयत्न सुरू होते. […]
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना धरणगाव जवळ अचानक गाडीचे टायर फुटले. गाडीचा वेग कमी असल्यानं व चालकाने प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली. या गाडीत एकनाथ खडसे यांच्यासह काही कार्यकर्तेही होते. सगळे जण सुखरूप आहेत. सुदैवानं यात एकनाथ खडसे यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत. त्याचबरोबर कुणालाही दुखापत झालेली […]
हडपसर परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार
पुणे : हडपसर परिसरात आणखी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिवारी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाने पीडित मुलीवर ओळखीचा गैरफायदा घेत फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केला होता. त्यानंतर पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.
निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा : संजय राऊत
मुंबई : निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे. निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. कोरोनावरील लस बिहारमधील जनतेला मोफत देऊ, असे आश्वासन दिले आहे. भाजपच्या या आश्वासनावर काँग्रेस, शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. परंतु निवडणूक आयोगाना यासदंर्भात भाजपला क्लीन चिट देण्यासंदर्भात विचारलेल्या […]
थर्माकोल कंपनीला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही
मुंबई : नालासोपारा पूर्वेतील पेल्हार जाबरपाडा येथे थर्माकोलच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण आहे की त्यामुळे कंपनी असलेल्या संपूर्ण परिसरात धुराचे प्रचंड लोळ पहायला मिळत आहे. या लागलेल्या आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले आहे. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबात राष्ट्रीय महामार्गावर नालासोपारा फाट्याजवळ ही […]
बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ.रामराव बापु महाराज यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई : बंजारा समाजाचे धर्मगुरू व संत सेवालाल महाराजांचे वंशज डॅा. रामराव महाराज यांचे मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने राञी अकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. बंजारा समाजाचे रामरावबापू महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 रोजी पोहरादेवी येथे झाला. त्यांची प्रकृती वर्षभरापासून अस्थिर होती, त्याच्यावर उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी श्वसनाचा ञास सुरू झाल्याने त्यांच्यावर […]










