मुंबई : बंजारा समाजाचे धर्मगुरू व संत सेवालाल महाराजांचे वंशज डॅा. रामराव महाराज यांचे मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने राञी अकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. बंजारा समाजाचे रामरावबापू महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 रोजी पोहरादेवी येथे झाला. त्यांची प्रकृती वर्षभरापासून अस्थिर होती, त्याच्यावर उपचार सुरू होते. काही महिन्यांपूर्वी श्वसनाचा ञास सुरू झाल्याने त्यांच्यावर मुंबई लिलावती रूगणालयात उपचार सुरू होते. काल कोजागीरी पौर्णिमेच्या दिवसी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्यांच्या सोबत मंहत शेखर महाराज होते. तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष किशनभाऊ राठोड होते.
रामराव महाराज यांनी 1948 मध्ये पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या गाधीवर वयाच्या 14 व्या वर्षी परिसरातील 52 गावच्या नाईक यांनी संत परशराम महाराज शिवलिन झाल्यावर बसविले. 12 वर्ष अनुष्ठान व 12 वर्ष मौन धारण केल्यावर बापू यांनी देशात भ्रमतीला सुरवात केली. रामराव महाराज यांच्याविषयी बंजारा समाजाची अपार श्रध्दा असुन त्यांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कर करण्यात येणार असल्याचे माहिती मंहत बाबूसिंग महाराज, संजय महाराज बापुचे वंशज यांनी कळविले आहे.
Shri Ramrao Bapu Maharaj Ji will be remembered for his service to society and rich spiritual knowledge. He worked tirelessly to alleviate poverty and human suffering. I had the honour of meeting him a few months ago. In this sad hour, my thoughts are with his devotees. Om Shanti. pic.twitter.com/o1LjExjSWH
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2020