मुंबई : माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स क्षेत्रात महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे. आगामी काळात फ्रान्ससारख्या देशांकडून तंत्रज्ञानाची साथ लाभल्यास राज्यात डिजिटल क्रांती घडेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. इंडो-फ्रान्स चेंबर्स ऑफ कॉमर्सची 44 वी सर्वसाधारण सभा मुंबईतील हॉटेल ताज येथे पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देसाई बोलत होते. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, […]
मुंबई
आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रो चाचण्या पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वाची मेट्रो मार्गिका कुलाबा ते सीप्झ साठीच्या मेट्रो रेल्वेची डब्यांची मरोळ मरोशी येथे चाचणी करण्यात येणार आहे. आरेतील राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या त्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी करण्यात येणार असून आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. […]
मोठी बातमी! केईएम मधील MBBS च्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
मुंबई : मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या (केईएम) किमान 29 विद्यार्थ्यांची कोविड -19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापैकी 27 विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या दोनही लस घेतलेल्या आहेत. संक्रमित विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात आहेत तर सहा विद्यार्थी पहिल्या वर्षात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन विद्यार्थ्यांना शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, […]
मुंबईत आणखी एका दहशतवाद्याला ATS कडून अटक
मुंबई : महाराष्ट्र ATS ने मोठी कारवाई करत एका संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक केली आहे. मागील महिन्याभरात यासंबंधातली मुंबईतील ही तिसरी अटक आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इरफान रेहमत अली शेख आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या झाकीर आणि रिझवान या दहशतवाद्यांनंतर […]
सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग तसेच मुंबईतील आपला कार्यकाळ संपवून मायदेशी परत जात असलेले वाणिज्यदूत गेविन चॅय यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंगापूरचे मुंबईतील उप वाणिज्यदूत (राजकीय) झॅकेयुस लिम देखील उपस्थित होते. सिंगापूरची स्वतःची गृहबाजारपेठ नसल्यामुळे मुंबईतील आपल्या कार्यकाळात सिंगापूर व […]
मुंबईः बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपूलाचा भाग कोसळला; 14 मजूर जखमी
मुंबईः मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुल परिसरात शुक्रवारी पहाटे बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 मजूर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने काही मजूर पूलावर उपस्थित होते. त्यावेळी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान या पूलाचा एक गर्डर खाली कोसळला. यावेळी मजूर खाली कोसळले. या सर्व […]
मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण..
मुंबई : मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनोज पाटीलने गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मनोज पाटील याने सुसाईट नोट लिहिली असून त्यामध्ये अभिनेता साहिल खान आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. मनोज पाटीलने अभिनेता साहिल […]
मंत्रिमंडळ निर्णय : मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही अशी सुधारणा करणार
मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 27 टक्के आरक्षण ठेवून, ओबींसीसह एकूण मागासवर्गीय जागांपैकी एकत्रित आरक्षण 50 टक्क्यांहून जास्त होणार नाही अशी सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या अधिनियमात सुधारणा करण्याचा ग्राम विकास विभागाने प्रस्ताव आणला. या प्रस्तावाच्या अनुषंगाने चर्चा […]
शहरी भागातील जनतेला मोठा दिलासा, शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करणार
मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच जुलै व ऑगस्टमध्ये राज्यात झालेली अतिवृष्टी लक्षात घेता आता शहरी भागातही नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. हा निर्णय अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नाने घेण्यात आला आहे. राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारांच्या उत्पन्नात वाढ करण्याकरिता रास्त भाव दुकानांची […]
मुंबईत लाजिरवाणी घटना! जावयाने केली सासूची हत्या, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बांबू घुसवला…
मुंबई : महाराष्ट्रात आजकाल गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आता आणखी एक लाजिरवाणी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईच्या विलेपार्ले येथे एका जावयाने आपल्या सासूची हत्या केली आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बांबू घुसवला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]










