मुंबई : महाराष्ट्र ATS ने मोठी कारवाई करत एका संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक केली आहे. मागील महिन्याभरात यासंबंधातली मुंबईतील ही तिसरी अटक आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इरफान रेहमत अली शेख आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या झाकीर आणि रिझवान या दहशतवाद्यांनंतर एटीएसने मोहम्मद इरफान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.




