Dhananjay Munde's troubles escalated, his second wife complained of serious allegations
महाराष्ट्र मुंबई राजकारण

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला

मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी ‘स्ट्रोक’ आल्याने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने आणि “स्ट्रोक” आल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंडे यांना जून 2020 आणि मार्च 2021 मध्ये अशी दोनदा कोरोनाची लागण झाली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बुधवारी रुग्णालयात मुंडे यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले, “त्यांची (मुंडे) प्रकृती ठीक आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. मी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेतली. मी डॉक्टरांना त्यांची कसून तपासणी करण्यास सांगितले आहे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, असे मुंडे यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात म्हटले आहे. धनंजय मुंडे यांची चुलत बहीण आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे, राज्यमंत्री छगन भुजबळ आणि दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांची भेट घेतली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत