Mr India bodybuilder Manoj Patil's suicide attempt
महाराष्ट्र मुंबई

मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण..

मुंबई : मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनोज पाटीलने गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मनोज पाटील याने सुसाईट नोट लिहिली असून त्यामध्ये अभिनेता साहिल खान आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मनोज पाटीलने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते. हा त्रास आणि छळ असह्य झाल्यामुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं मनोजने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. बुधवारी रात्री मनोज पाटीलने आत्महत्या करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.

साहिल खानने 2001 साली ‘स्टाइल’ या सिनेमात काम केले. त्यानंतर 2010 साली त्याने ‘रामा: द सेवियर’ चित्रपटात काम केले. त्यानंतर त्याने गोव्यात जिम सुरू केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत