Mumbai Metro to run from tomorrow

अनलॉक ५ : उद्या पासून मुंबई मेट्रो सेवा सुरु

महाराष्ट्र मुंबई

राज्य सरकारने आज अनलॉक प्रक्रियेत आणखी काही निर्णय घेतले असून त्यात मुंबई मेट्रो रेल्वे सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यानुसार उद्या (१५ ऑक्टोबर) पासून मेट्रो सेवा सुरु होणार आहे. मेट्रो सेवेसाठी नगरविकास विभागाने जी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत ती या सेवेसाठी लागू असतील. त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी ग्रंथालये उद्यापासून सुरू करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, नियमितपणे सॅनिटायझेशन करावे, असे नमूद करण्यात आले आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षणाकडून लागू होणारी मार्गदर्शक तत्वे लागू असतील असेही सांगण्यात आले आहे.

कंटेन्मेंट झोन वगळून अन्य भागांत व्यापार प्रदर्शनांनाही परवानगी देण्यात आली आहे. याबाबत उद्योग विभागाची मार्गदर्शक तत्वे पाळावी, असे नमूद करण्यात आले आहे. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात उद्यापासून आठवडा बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनेक छोट्या शहरांमध्ये जनावरांचेही बाजार भरतात. ते सुरू करण्यासही अनुमती देण्यात आली आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियम लागू असणार आहेत.

दरम्यान, राज्यातील शाळा, कॉलेज तसेच अन्य सर्व शैक्षणिक आणि कोचिंग संस्था ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहतील, असे नमूद करण्यात आले आहे. मुंबई लोकल बाबतही कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत