Mhada Given Permission To Sunil Gavaskar Foundation For Indoor Cricket Training Center

मोठी बातमी! महाराष्ट्र सरकारने दिली ‘त्या’ भुखंडाला मान्यता

क्रीडा

मुंबई : भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना म्हाडाने पत्र पाठवून सुनील गावसकर फाऊंडेशनसाठीच्या भुखंडाबाबत मोठी बातमी दिली आहे. सुनील गावसकर फाऊंडेशनने महाराष्ट्र सरकारकडे वांद्रे-कुर्ला संकुल येथे इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रासाठी भुखंड मागितला होता. महाराष्ट्र सरकारने आज या दोन हजार चौरस मीटर भुखंडाला मान्यता दिली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सुनील गावसकर फाऊंडेशनला या केंद्रातून होणाऱ्या नफ्यातील २५ टक्के भाग सरकारला द्यावा लागणार आहे. सुनील गावस्कर फाऊंडेशनला हा करार करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली असून सुनील गावसकर फाऊंडेशनला या जमिनीचा ताबा मिळेल तेव्हापासून एका वर्षाच्या आत बांधकामाला सुरुवात करायची आहे. तसेच त्यांना तीन वर्षांमध्ये हे बांधकाम पूर्ण करावे लागेल.

या प्रशिक्षण केंद्रामध्ये बॅडमिंटन, फुटबॉल आणि टेबल टेनिस या खेळांना परवानगी देण्यात आली आहे. येथे हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, व्यायामशाळा, स्विमिंग पूल बांधण्यात येणार आहे. या जागेमध्ये अन्य खेळांसह क्रिकेटचेही प्रशिक्षण देण्यात येईल, अशी हमी सुनील गावसकर फाऊंडेशनला द्यावी लागणार आहे. स्कॉश या खेळासाठीही व्यवस्था करण्यात येणार आहे. खेळाडूंना व्याख्यान देण्यासाठी ऑडिटोरियमही बांधण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रात मेडिसीन सेंटरही बांधण्यात येणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत