Ranji Trophy canceled for first time in 87-year history
क्रीडा

BCCI चा मोठा निर्णय, 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटची सर्वोच्च स्पर्धा रद्द

मुंबई : भारतीय क्रिकेटच्या 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धा होणार नाहीत. तसं बीसीसीआयने सलग्न संघटनांना पत्राद्वारे कळवलं आहे. भारतीय क्रिकेटची सर्वोच्च स्पर्धा म्हणून रणजी करंडक स्पर्धा ओळखली जाते. पण यंदाच्या रणजी करंडकचे सामने रद्द करुन बीसीसीआयने त्या बदल्यात पुरुष, महिला गटातील विजय हजारे राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रणजी हे नाव क्रिकेटपट्टू रणजितसिंह यांच्या नावावरुन देण्यात आलं. भारतात रणजी सामन्यांची सुरुवात 1934 सालापासून करण्यात आली. तेव्हापासून या स्पर्धेमध्ये कोणताही खंड पडला नाही. इतक्या वर्षात पहिल्यांदाच कोरोनामुळे या सामन्यांचे आयोजन रद्द करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून रणजी करंडक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी त्याबाबत सर्व संलग्न संघटनांना पत्र लिहलं आहे. त्या पत्रात सांगितलं आहे की रणजी सामने रद्द करुन त्या बदल्यात विजय हजारे स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. सोबत महिलांच्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं आहे.  रणजी करंडकाचे आयोजन रद्द केलं असलं तरी या सामन्यात खेळणार असलेल्या सर्व खेळाडूंना मानधन देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.  बीसीसीआने ही स्पर्धा रद्द करण्यापूर्वी सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटनांचे मत मागवलं होतं. बहुतेक क्रिकेट संघटनांनी बीसीसीआयच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला, त्यानंतर बीसीसीआयने रणजी सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत