Big decision of railway administration for pass holders traveling from Mumbai local

रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना मोठा दिलासा

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : उद्यापासून मुंबई लोकल सेवा सर्व प्रवाशांसाठी सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेऊन लोकलच्या जुन्या पासधारकांना मोठा दिलासा दिला आहे. जुन्या पासधारकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोनामुळे 24 मार्च 2020 पासून लोकल सेवा बंद होती. परंतु, त्यापूर्वी ज्या प्रवाशांनी मुंबई लोकलचे एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांचे पास काढले होते. अशा प्रवाशांना पासची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. लॉकडाऊननंतर रेल्वे पासचे जेवढे दिवस शिल्लक राहिले आहेत, तेवढी मुदतवाढ प्रवाशांना देण्यात येणार असल्याचं रेल्वे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या पासधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं सांगितलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला रेल्वे मंत्रालयाकडूनही हिरवा कंदिल देण्यात आला आहे. आता गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.

  1. सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे.
  2. सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवेने प्रवास करता येणार नाही. या वेळेत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत