Son-in-law kills mother-in-law and puts bamboo in her private part

मुंबईत लाजिरवाणी घटना! जावयाने केली सासूची हत्या, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बांबू घुसवला…

क्राईम महाराष्ट्र मुंबई

मुंबई : महाराष्ट्रात आजकाल गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आता आणखी एक लाजिरवाणी घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईच्या विलेपार्ले येथे एका जावयाने आपल्या सासूची हत्या केली आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बांबू घुसवला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने आपल्या सासूची निर्घृण हत्या केली आणि नंतर मृतदेहाची विटंबना केली. आरोपीने आपल्या सासूच्या डोक्यावर टाइलने हल्ला केला, त्यानंतर तिच्यावर चाकूने अनेक वार केल्यानंतर, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बांबू घुसवून तिचे अंतर्गत अवयव बाहेर काढले. पोलिसांनी कलम 377 अंतर्गत (अनैसर्गिक गुन्हा) गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित महिला तिच्या मुलीसोबत राहत होती. आरोपी चेन स्नॅचिंगमध्ये दोषी आढळला होता आणि तीन वर्षे तुरुंगात होता. दरम्यान, 1 सप्टेंबरला त्याची तुरुंगातून सुटका झाली आणि आरोपी त्याच्या पत्नीला भेटायला गेला. त्यावेळी त्याने बघितले की त्याच्या बायकोने दुसऱ्या कुणाशीतरी लग्न केले आहे आणि ती गर्भवती देखील आहे. हे पाहून आरोपी संतापला आणि त्याने पत्नीला तिच्या दुसऱ्या पतीला सोडून देण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पत्नीला भेटायला गेला, तेव्हा ती ते घर सोडून निघून गेली होती. त्यानंतर आरोपीने त्याच्या सासूला याबद्दल जाब विचारला, पण सासू काहीच बोलली नाही. त्यामुळे रागाच्या भरात त्याने सासूला मारहाण केली. तिच्या डोक्यात टाइल घातली, त्यानंतर तिच्यावर चाकूने अनेक वार केले. एवढ्यावरच तो थांबला नाही, त्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बांबू घुसवला. पोलिसांनी या आरोपीला पुण्यातून अटक केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत