The body of a person who was swept away in the flood found four months later

टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने दात घासल्याने तरुणीचा मृत्यू

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खान हिचा टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मृत्यू झाला आहे. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट ठेवलेली असल्यामुळे शुक्रवारी सकाळी अफसानाने टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली आणि दात घासले, त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय अफसाना खान सकाळी उठली आणि दात घासायला बाथरुममध्ये गेली. नकळत तिने ब्रशवर उंदीर मारायची पेस्ट लावली आणि ब्रश करू लागली, तिला पेस्टचा वास आणि चव वेगळीच वाटली. त्यानंतर आपण उंदीर मारायची पेस्ट लावल्याचं तिच्या लक्षात आलं, तिने तातडीने तोंड धुऊन काढलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, अफसानाला चक्कर येऊ लागली आणि तिची तब्येत खालावली. तिने तिच्या कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. घरच्यांनी तात्काळ अफसानाला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात दोन दिवस अफसानावर उपचार सुरु होते, मात्र रविवारी संध्याकाळी अफसानाचा मृत्यू झाला.

अफसानाच्या कुटुंबात आई, वीस वर्षीय बहीण आणि दोन लहान भाऊ आहेत. आई फळं विकून घर चालवत होती. पोलिसांनी या प्रकरणात एडीआर दाखल करून तिच्या आईचा जबाब नोंदवला. तिच्या आईने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान, याप्रकरणी धारावी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत