Digital revolution will take place through startups in Maharashtra and technology from France
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील स्टार्टअप्स व फ्रान्सच्या तंत्रज्ञानाद्वारे घडेल डिजिटल क्रांती

मुंबई : माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्स क्षेत्रात महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे. आगामी काळात फ्रान्ससारख्या देशांकडून तंत्रज्ञानाची साथ लाभल्यास राज्यात डिजिटल क्रांती घडेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. इंडो-फ्रान्स चेंबर्स ऑफ कॉमर्सची 44 वी सर्वसाधारण सभा मुंबईतील हॉटेल ताज येथे पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देसाई बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उद्योगमंत्री देसाई म्हणाले, फ्रान्समधील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात स्थायिक असून देशाच्या व राज्याच्या औद्योगिक प्रगतीला हातभार लावत आहेत. कोविड काळात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी फ्रान्समधील कंपन्यांनी मोलाचा वाटा उचलला. सध्या माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप्सचे हब म्हणून महाराष्ट्र नावारुपास येत आहे. फ्रान्समधील तंत्रज्ञानाची साथ लाभल्यास महाराष्ट्र प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.

औद्योगिक क्षेत्रातील बदलांमुळे आगामी काळात महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमिचे उद्दिष्ट पूर्ण करणारे पहिले राज्य ठरेल, असेही देसाई म्हणाले. यावेळी चेंबर्सच्या अध्यक्षपदी सुमीत आनंद यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल देसाई यांनी आनंद यांचे अभिनंदन केले. फ्रान्सचे भारतातील दूतावास इमॅयुल लेअनिन यांनी दोन्ही देशांतील औद्योगिक, राजकीय संबधांबाबत माहिती दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत