The newly appointed Consul General of Singapore met the Governor Bhagat Singh Koshyari

सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग तसेच मुंबईतील आपला कार्यकाळ संपवून मायदेशी परत जात असलेले वाणिज्यदूत गेविन चॅय यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची आज राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंगापूरचे मुंबईतील उप वाणिज्यदूत (राजकीय) झॅकेयुस लिम देखील उपस्थित होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सिंगापूरची स्वतःची गृहबाजारपेठ नसल्यामुळे मुंबईतील आपल्या कार्यकाळात सिंगापूर व भारतातील आर्थिक सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे नवे वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी राज्यपालांना सांगितले. भारतातील अनेक विद्यार्थी सिंगापूर येथे उच्च शिक्षण घेत असून सिंगापूरच्या विद्यार्थ्यांचा कल मात्र इंग्लंड, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये शिक्षण घेण्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील आपला तीन वर्षांचा कार्यकाळ अतिशय चांगला गेल्याचे मावळते वाणिज्यदूत गेविन चॅय यांनी राज्यपालांना सांगितले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला येथे आपण प्रशिक्षण घेतले असल्यामुळे संपूर्ण भारत आपल्या परिचयाचा असल्याचे गेविन चॅय यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत