मुंबई : मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खान हिचा टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मृत्यू झाला आहे. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट ठेवलेली असल्यामुळे शुक्रवारी सकाळी अफसानाने टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली आणि दात घासले, त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय अफसाना खान सकाळी उठली […]
मुंबई
मोठी बातमी! साकीनाका घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशीदेखील बोललो आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशीदेखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या […]
साकीनाका बलात्कार पिडीतेचे निधन
मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार पिडीतेचे निधन झाले आहे. साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचे अमानुष कृत्य केले होते. या महिलेची प्रकृती चिंताजनक होती, मात्र आता या महिलेचे निधन झाले आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीसांनी गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला अटकही केली होती. बलात्कारानंतर संशयिताने महिलेच्या गुप्तांगात रॉड […]
अमानुष कृत्य! मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या गुप्तांगात रॉड घुसवला
मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. आरोपींनी बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचे अमानुष कृत्य देखील केले आहे. या महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भयंकर घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. बलात्काऱ्यांना अतिशय कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाकाच्या खैरानी […]
जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो, अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज वर्षा येथे मुख्यमंत्री व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेश प्रतिष्ठापना करण्यात […]
महिला कॉन्स्टेबलने केली पुरुष कॉन्स्टेबलची हत्या, तब्बल एक महिन्यानंतर समोर आलं सत्य…
मुंबई : एका पुरुष कॉन्स्टेबलची हत्या केल्याप्रकरणी एक महिला कॉन्स्टेबल आणि तिच्या दोन साथीदारांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येला अपघाताचे रूप देण्यात आले होते. मात्र, तब्बल एक महिन्यानंतर ही सुपारी देऊन केलेली हत्या असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय शिवाजी माधव सानप हे दररोज पनवेल स्टेशनवरून जात असत. पनवेलहून ट्रेनने […]
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, अंजली दमानिया वरच्या कोर्टात दाद मागणार
मुंबई : महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. […]
अनिल देशमुख यांची ईडीविरोधात याचिका, समन्स रद्द करण्याची मागणी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. मात्र या याचिकेच्या वैधतेवरच केंद्र सरकारनं जोरदार आक्षेप नोंदवला आहे. या याचिकेची सुनावणी खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी केंद्र सरकारतर्फे सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी केली. ते म्हणाले की याचिका एकलपीठापुढे मांडली जाऊ शकत नाही, […]
गोरेगावमधील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास होणार
मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. म्हाडाच्या गोरेगाव (प.) येथील मोतीलाल नगर 1, 2 व 3 येथे सुमारे 50 हेक्टर ऐवढ्या जागेवर गाळ्यांची अंदाजित संख्या 3700 व झोपड्यांची संख्या अंदाजे 1600 अशी एकत्रित […]
8 सप्टेंबर 2021 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
मुंबई : महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तसेच महानिर्मितीकडून भाग भांडवल उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 187 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी तसेच 390 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी दोन स्वतंत्र प्रस्तांवाना मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 187 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यास मंजूरी […]










