मुंबई : ज्ञानोबा, तुकाराम आणि इतर संत परंपरा, फुले- शाहू- आंबेडकर यांची विचारसरणी यामुळे जसे महाराष्ट्राला ओळखले जाते, तसेच वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र म्हणूनही एक वेगळी ओळख आहे. या वारकरी संप्रदायासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा राज्य शासनामार्फत तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद […]
मुंबई
मुंबई पब्लिक स्कुलमध्ये सुरु होणार आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम, केंब्रिज विद्यापीठाशी सहमतीचा करार
मुंबई : देशात आणि जगात जे सर्वोत्तम असेल त्या पद्धतीचे शिक्षण मुंबईतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. भविष्यात राज्य शासनामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना असे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय बोर्डाचा शैक्षणिक […]
अक्षय कुमारच्या आईची प्रकृती चिंताजनक, अक्षय शूटिंग सोडून लंडनहून परतला
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया या मुंबईत रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अक्षयच्या आईला शुक्रवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आता त्यांची प्रकृती खालावली आहे. अक्षय कुमारला त्याच्या आईबद्दल समजल्यानंतर, तो शक्य तितक्या लवकर यूकेमधून भारतात आला. अक्षय […]
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, ‘ती’ याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाईपासून कोणताही दिलासा मिळाला नाही. अनिल देशमुख यांनी ईडीच्या कारवाईविरोधात आणि ईडी समन्स रद्द करण्याबाबत केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पात्र लिहून त्यात आरोप केला होता की अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदावर असताना दरमहा १०० […]
‘त्या’ प्रकरणाला वेगळे वळण; CBI ने अनिल देशमुख यांच्या जावयाला तर सोडले, पण…
मुंबई: सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना २० मिनिटांच्या चौकशीनंतर जाऊ दिले असून देशमुख यांच्या लीगल टीममधील वकील आनंद डागा यांना ताब्यात घेण्यात आले आहे व त्यांची अजूनही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. डागा यांच्यावर अटकेची कारवाई होण्याचीही शक्यता आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिल्याचा प्राथमिक चौकशी अहवाल […]
वातावरणात तापमान वाढ झाल्यास महाराष्ट्रात होईल भीषण परिस्थिती, मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती
मुंबई : इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेने वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने सादर केलेल्या अहवालाबाबत आज पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने सादरीकरण करून महाराष्ट्रामध्ये या वातावरण बदलाचे किती गंभीर परिणाम होतील याविषयी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार […]
1 सप्टेंबर 2021 : मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
मुंबई : सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या (पीपीपी) माध्यमातून राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करून वैद्यकीय सुविधात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या धोरणाची अंमलबजावणी पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या (IFC) मदतीने करण्यात येईल. दुर्गम भागातील प्रकल्पांना आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून उद्योग विभागाची पॅकेज […]
कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत रविवारी टास्क फोर्सची ऑनलाईन वैद्यकीय परिषद, राज्यातील सर्व डॉक्टर्स होणार सहभागी
मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार, असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख […]
रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यात वाहतूक नियमनाची अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा 76 वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमआरडीए मैदान, वांद्रे […]
महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणारा फेरीवाला पोलिसांकडून सुटेल तेव्हा… राज ठाकरे यांनी व्यक्त केला संताप
मुंबई : ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या पथकामार्फत सोमवारी कारवाई सुरू होती. यावेळी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची तीन बोटे कापली गेली असून त्यांच्या दुसऱ्या हाताला आणि डोक्यावर […]










