Ed Raids At Anil Deshmukh House In Nagpur and mumbai

‘त्या’ प्रकरणाला वेगळे वळण; CBI ने अनिल देशमुख यांच्या जावयाला तर सोडले, पण…

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई: सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना २० मिनिटांच्या चौकशीनंतर जाऊ दिले असून देशमुख यांच्या लीगल टीममधील वकील आनंद डागा यांना ताब्यात घेण्यात आले आहे व त्यांची अजूनही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. डागा यांच्यावर अटकेची कारवाई होण्याचीही शक्यता आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिल्याचा प्राथमिक चौकशी अहवाल लीक झाला होता. या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना आज मुंबईतील वरळी येथून सीबीआयने ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्याने खळबळ उडाली. त्यांच्यासोबत देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत देशमुख कुटुंबीयांकडून वरळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गौरव चतुर्वेदी आणि आनंद डागा यांचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. या घडामोडी सुरू असतानाच सीबीआयमधील सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

सीबीआयमधील सूत्रांकडून जी माहिती समोर येत आहे ती अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढवणारी आहे. अनिल देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना १०० कोटी वसुलीचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राथमिक चौकशीअंती देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली आहे आणि फाइल बंद करण्याची शिफारस करण्यात आल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वी लीक झाला होता. याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यात सीबीआय मधील कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांना लाच देत हा अहवाल तयार करण्यात आल्याचा व पद्धतशीरपणे लीक करण्यात आल्याचा संशय बळावला आहे. याबाबत अंतर्गत चौकशी सुरू आहे, शिवाय देशमुख तसेच त्यांच्या लीगल टीमने या अधिकाऱ्यांसोबत संगनमत केले का, याचा तपासही सीबीआय करत आहे. त्याचाच भाग म्हणून सीबीआयने आज गौरव चतुर्वेदी आणि वकील आनंद डागा यांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. चतुर्वेदी यांनी त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले असून त्यांना सीबीआयने घरी जाऊ दिले आहे तर आनंद डागा यांची मात्र अजूनही चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत