Punishment of impotence for rape in Pakistan

साकीनाका बलात्कार पिडीतेचे निधन

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार पिडीतेचे निधन झाले आहे. साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्काराची घटना घडली होती. बलात्कारानंतर पीडितेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचे अमानुष कृत्य केले होते. या महिलेची प्रकृती चिंताजनक होती, मात्र आता या महिलेचे निधन झाले आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीसांनी गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला अटकही केली होती. बलात्कारानंतर संशयिताने महिलेच्या गुप्तांगात रॉड घातल्याची माहिती मिळाली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबरला साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. आरोपीने रस्त्यात उभ्या असलेल्या टेम्पोत हे कृत्य भयंकर केलं होतं. त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिलेला आरोपी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाबाबत एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन सांगितले होते, त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पीडित महिला रक्तबंबाळ आणि बेशुद्धावस्थेत टेम्पोत आढळली होती. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झालेली होती.

पोलिसांनी पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, पीडितेची परिस्थिती चिंताजनक होती. पिडीतेचा खूप रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी महिलेला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अडीच ते तीन तास शस्त्रक्रिया चालली होती. परंतु, आता महिलेची मृत्यूशी झुंज आणि डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही वेळापूर्वीच रुग्णालयात जाऊन पीडित महिलेच्या प्रकृतीची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली होती की, पीडित महिलेसोबत तिची आई आहे. पीडितेच्या आईने सांगितले की, जो इसम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे, त्याच्यासोबत महिला 10-12 वर्षांपासून राहत होती आणि त्यांच्यात वारंवार भांडणे सुद्धा होत होती.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत