Actor Sai Dharam Tej had an accident

अभिनेता साई धरम तेजचा अपघात

मनोरंजन

चेन्नई : अभिनेता साई धरम तेज याचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. हा अपघात रात्री 8.30 च्या सुमारास चेन्नईच्या दुर्गमचेरुवु केबल ब्रिजच्या जवळ झाला. साई धरम तेज स्पोर्ट्स बाईक चालवत असताना रस्त्यावरील चिखलावरून त्याची बाईक घसरली आणि हा अपघात झाला. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई धरम तेजने बाईक चालवताना हेल्मेट घातले होते तसेच त्याने दारुचे सेवनही केले नव्हते. रस्त्यावरील चिखलामध्ये बाईक घसरल्याने हा अपघात झाला. साई धरम तेजचा अपघात झाल्यानंतर त्याला तातडीने चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. साई धरम तेजच्या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

अपोलो हॉस्पिटलने अभिनेता साई धरम तेजच्या तब्येतीची माहिती प्रसिद्ध केली असून त्याला कोणतीही गंभीर इजा झालेली नसल्याचे सांगितले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत