Famous actor fahadh faasil was injured when he fell from a height while doing a stunt
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेता फहद फासिलला स्टंट करताना उंचावरून खाली पडल्यामुळे दुखापत

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता फहद फासिल याला स्टंट करताना दुखापत झाली आहे. आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सेटवर झालेल्या एका अपघातात फहदच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. एका स्टंट सीनसाठी उंचावरून उडी मारताना तोल गेल्यानं फहद खाली पडला होता. फहद फासिल ‘मलयानकुंजू’ या मल्याळम चित्रपटाचं शूटिंग करत आहे. शूटिंगदरम्यान एका सीनमध्ये त्याला उंचावरून उडी मारायची होती. […]

Income tax department raids the homes of actress Tapsi Pannu and director Anurag Kashyap
पुणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

अनुराग-तापसीची आयकर विभागाकडून कसून चौकशी, रात्रभर 22 ठिकाणी छापेमारी

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल आणि मधू मंटेना यांच्यावर आयकर विभागाने काल छापेमारी केली. रात्रभर ही छापेमारी सुरु होती. यादरम्यान तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांची पुण्यात चौकशीही झाली. आयकरची छापेमारी कायदेशीररित्या झाली आहे असं केंद्र सरकारने सांगितलं तर सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीने केला. टॅक्स […]

Income tax department raids the homes of actress Tapsi Pannu and director Anurag Kashyap
मनोरंजन

ब्रेकिंग : अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरी आयकर विभागाचा छापा

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि मधु मन्तेना यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. इन्कम टॅक्सचे अधिकारी मधु मन्तेनाची टँक मॅनेजमेंट कंपनी क्वानच्या कार्यालयातही पोहोचले आहेत. फॅन्टम चित्रपटाच्या कर चुकवण्याच्या संदर्भात हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर चुकवल्याप्रकरणी इन्कम टॅक्स विभागाने फॅंटम चित्रपटांशी संबंधित लोकांवर छापे टाकले आहेत. […]

Azfar Rehman
मनोरंजन

महिला कलाकारांनी माझं शोषण केलं; अभिनेत्यानं केला धक्कादायक खुलासा

मुंबई: अभिनेता अजफर रहमान नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं त्याच्या या प्रवासाविषयी सांगितलं तसेच अभिनय क्षेत्रात काम करताना आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांबद्दलही अनेक खुलासे केले आहेत. मी टू चळवळीसारख्या विषयावरही त्यांनी भाष्य केलं. अभिनेता अजफर रहमान म्हणाला कि , मी टू हा खूपच संवेदनशील विषय आहे. कोणत्याही व्यक्तीचं अशाप्रकारे शोषण होणं ही चुकीची गोष्ट आहे. सर्वांनाच […]

Punjab's famous singer Sardul Sikander dies
मनोरंजन

ब्रेकिंग : प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे निधन

पंजाबचे प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरदुल सिकंदर बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात किडनीच्या समस्येने ग्रस्त झाल्यानंतर सिकंदर यांना रुग्णालयात दाखल […]

Actor Indrakumar commits suicide by hanging
मनोरंजन

आणखी एका अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, अभिनेता इंद्रकुमारची गळफास घेऊन आत्महत्या

तमिळ अभिनेता इंद्रकुमारनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अजून एका अभिनेत्याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या केली त्या ठिकाणी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे इंद्र कुमारनं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, इंद्र कुमार या टीव्ही अभिनेत्यानं त्याच्या मित्राच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मित्राला […]

sandeep nahar
मनोरंजन

एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने केली आत्महत्या.. आत्महत्यापूर्वी शेअर केला व्हिडिओ… जाणून घ्या

मुंबई : एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटात काम करणारा अभिनेता छोटू भैय्या म्हणजे संदीप नहार याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्याने आत्महत्या करण्यामागचं कारण सांगितलं आहे. तो वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अस्वस्थ होता असं सांगितलं. पोलिसांना यासंबंधी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आहेत. गुन्हा दाखल करत तपास […]

Rheas FIR against Sushant's sister Priyanka will not be quashed
मनोरंजन महाराष्ट्र

ब्रेकिंग : सुशांतची बहीण प्रियंकाच्या अडचणीत वाढ, रियाने केलेली FIR रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण प्रियंकाविरूद्ध दाखल केलेली FIR रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (15 फेब्रुवारी) नकार दिला. परंतु, त्याची दुसरी बहीण मितूविरुद्ध दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याचा आदेश देण्यात आला त्यामुळे तिला दिलासा मिळाला आहे. ही FIR सुशांतसिंग राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीने दाखल केली होती. पटना येथे सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रिया […]

Actress Anita Hasanandani blessed with baby boy
मनोरंजन

अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन

अभिनेत्री अनिता हसनंदानीच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. ९ फेब्रुवारी रोजी अनिताने मुलाला जन्म दिला आहे. अनिताचा पती रोहित रेड्डीने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना बाबा झाल्याची बातमी दिली.   View this post on Instagram   A post shared by Rohit Reddy (@rohitreddygoa)

The allegations against me are false and unethical, Sunny Leone explained on those allegations
मनोरंजन

माझ्यावरचे आरोप खोटे व अनैतिक, ‘त्या’ आरोपांवर सनी लिओनीने दिले स्पष्टीकरण

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीवर लाखो रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी लाखो रुपये घेऊनही सनीनं कार्यक्रमाला दांडी मारल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आलाय. या सर्व प्रकरणावर आता सनीनं स्पष्टीकरण दिलं आहे. सनी लिओनी तिच्यावर कोची येथील एका इव्हेंट मॅनेजरने फसवणूकीची तक्रार दाखल केल्याने कायदेशीर अडचणीत सापडली आहे. मात्र, तिने या […]