Punjab's famous singer Sardul Sikander dies
मनोरंजन

ब्रेकिंग : प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे निधन

पंजाबचे प्रसिद्ध गायक सरदुल सिकंदर यांचे निधन झाले आहे. ते 60 वर्षांचे होते. पंजाबमधील मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरदुल सिकंदर बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गेल्या महिन्यात किडनीच्या समस्येने ग्रस्त झाल्यानंतर सिकंदर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले. हे ऑपरेशन यशस्वी झाले होते, परंतु त्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांचे प्रकृती खालावत गेली.

सरदुल सिकंदर यांनी अनेक पंजाबी हिट गाणी गायली आहेत. त्यांचा पहिला अल्बम 1980 मध्ये आला होता. ‘रोडवेज द लारी’ असे या अल्बमचे नाव होते. यानंतर, त्यांनी बरेच अल्बम काढले. 1991 साली आलेला त्यांचा ‘हुस्ना दे मलको’ अल्बम जगभरात प्रसिद्ध झाला. या अल्बमच्या 5.1 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या. गाण्यांशिवाय त्यांनी बर्‍याच चित्रपटांत अभिनय देखील केला. ‘जग्गा डाकू’ या पंजाबी चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत