आधार कार्ड हे सध्याच्या काळात सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. जवळजवळ प्रत्येक शासकीय कामात आधार कार्ड आवश्यक असते. हे यूनीक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) जारी केले आहे. यात वापरकर्त्यांची बायोमेट्रिक आणि इतर माहिती नोंदवते. परंतु, बऱ्याचदा आपल्याला काळजी वाटते की आपल्या आधार तपशीलांचा गैरवापर तर केला जात नाही ना? जर अशी भीती वाटत असेल तर आपल्या आधारचा वापर नक्की कुठे-कुठे केला गेला आहे, हे आपण शोधू शकता.
UIDAI वेबसाइटवर आधार इतिहास (Aadhar History) सेवेद्वारे कार्डधारकांनी आतापर्यंत त्यांची आधार कार्ड कुठे वापरली आहेत, याबद्दल माहिती मिळू शकते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबर अनिवार्य आहे. आधार कार्ड धारक मागील ६ महिन्यांत कोणत्याही प्रमाणीकरण युझर्स किंवा एजन्सीच्या वतीने (एयूए) केलेल्या सर्व प्रमाणीकरण रेकॉर्डचा तपशील पाहू शकतात. कोणताही आधार कार्ड धारक त्यांचा आधार क्रमांक / VID वापरून आणि वेबसाइटवर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून त्यांचे आधार प्रमाणीकरण इतिहास UIDAI वेबसाइटवरून तपासू शकतात. तथापि, एका वेळी जास्तीत जास्त 50 रेकॉर्ड बघता येतात.
माहिती कशी मिळवाल :
- यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर भेट द्या.
- ‘माझा आधार’ पर्यायावर क्लिक करा.
- एक नवीन विभाग उघडेल, त्यावर ‘आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री’ वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रतिमा भरा.
- त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल.
- ओटीपी प्रविष्ट करा.
- दोन पर्यायांसह नवीन विंडो उघडेल : विंडो ऑथेंटिकेशन टाइप आणि डेटा रेंज.
- आधारच्या वापराशी संबंधित सर्व माहिती मिळेल.
आधार प्रमाणीकरण इतिहासावरून (आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री) आपल्याला कोणती माहिती मिळू शकते ?
- ऑथेंटिकेशन कार्यक्षमता
- ऑथेंटिकेशनची तारीख आणि वेळ.
- UIDAI रिस्पॉन्स कोड
- एयूए नाव
- एयूए व्यवहार आयडी (कोडसह)
- ऑथेंटिकेशन प्रतिक्रिया (यश की अपयश)




