Famous actor fahadh faasil was injured when he fell from a height while doing a stunt
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेता फहद फासिलला स्टंट करताना उंचावरून खाली पडल्यामुळे दुखापत

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता फहद फासिल याला स्टंट करताना दुखापत झाली आहे. आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सेटवर झालेल्या एका अपघातात फहदच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. एका स्टंट सीनसाठी उंचावरून उडी मारताना तोल गेल्यानं फहद खाली पडला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

फहद फासिल ‘मलयानकुंजू’ या मल्याळम चित्रपटाचं शूटिंग करत आहे. शूटिंगदरम्यान एका सीनमध्ये त्याला उंचावरून उडी मारायची होती. मात्र, हा स्टंट करत असताना तोल जाऊन फहद उंचावरून खाली पडला. या दुर्घटनेनंतर फहदला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याला डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत