Actor Indrakumar commits suicide by hanging

आणखी एका अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, अभिनेता इंद्रकुमारची गळफास घेऊन आत्महत्या

मनोरंजन

तमिळ अभिनेता इंद्रकुमारनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अजून एका अभिनेत्याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या केली त्या ठिकाणी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे इंद्र कुमारनं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, इंद्र कुमार या टीव्ही अभिनेत्यानं त्याच्या मित्राच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मित्राला भेटायला त्याच्या घरी गेला होता. गुरुवारी इंद्रकुमार आणि त्याचा मित्र दोघे पिक्चर पाहण्यासाठी गेले होते. तिकडून आल्यानंतर इंद्रकुमार त्याच्या मित्राच्या घरीच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रानं त्याच्या रुमचा दरवाजा ठोठावला. परंतु आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रानं रुमचा दरवाजा उघडला, तर त्याला इंद्रकुमारचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

इंद्रकुमारच्या मित्रानं लगेचच याविषयी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चौकशीनंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

इंद्र कुमार विवाहित असून त्याला एक मुलगासुद्धा आहे. त्यानं अनेक तमिळ टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून इंद्रकुमारकडे काम नव्हतं. तो कामाच्या शोधात होता. मनोरंजन क्षेत्रातील चांगल्या संधी मिळविण्यात अपयशी ठरल्यानंतर इंद्रकुमार काही काळ चिंताग्रस्त होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत