मुंबई : फळविक्रेत्याने डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून टॅक्सीचालकाची हत्या केल्याची घटना आज दादरच्या गजबजलेल्या परिसरात घडली. छबीलाल जैस्वार (५५) असे मृत टॅक्सीचालकाचे नाव आहे. दादर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून काही तासांतच आरोपी बसवराज मेलिणामनी (३०) याला अटक केली आहे. टॅक्सीचालकाने जवळचे भाडे नाकारले, त्यामुळे संतापलेल्या फळविक्रेत्याने रागाच्या भरात हे भयानक कृत्य केले. या घटनेने […]
क्राईम
Stay informed with the latest crime news from Maharashtra and across India. Our Crime section covers breaking news, investigations, law enforcement updates, and crime-related events that shape public safety and security.
भयंकर : एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, तीन लहान मुलांचा समावेश
लखनौ : एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील इनायतनगर ठाण्याच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत असून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्ये संपत्तीच्या वादातून शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील पाच जणांची धारदार […]
भयंकर : पित्यानेच कुऱ्हाडीने वार करून केली दोन मुलांची हत्या, आणि…
पाटणा : बिहारची राजधानी पाटणाला लागून असलेल्या मोकामा येथे एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. ही घटना नगर पोलीस स्टेशन परिसरातील कन्हाईपुर गावातील आहे. येथील एका विक्षिप्त वडिलांनी गुरुवारी रात्री उशिरा आपल्या दोन मुलांचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. चंदन महतो असे या आरोपीचे नाव आहे. चंदन महतो याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यावरून त्याने […]
‘तुला मुलीच होतात’ असे म्हणत केली पत्नीची हत्या, सात वर्षांच्या मुलीने दिली वडिलांविरोधात साक्ष आणि..
जळगाव : पत्नीचा लाकडी दांडा डोक्यात मारुन खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने काल (१९ मे) जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पप्पू रतन पवार (वय ३१ रा. पाचोरा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी कस्तुराबाई पप्पू पवार (वय ३०) यांचा खून केला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असलेल्या आरोपीच्या […]
भयंकर : दारूच्या नशेत केली अनोळखी व्यक्तीची हत्या, अगोदर गळा आवळला नंतर चिरला, मग जिवंत जाळलं
नागपूर : नागपुरात एक अतिशय भयंकर घटना घडली आहे. काटोल पोलीस स्टेशन अंतर्गत सावळी शिवारात एका टॅक्सी चालक तरुणाची आरोपींनी अतिशय निर्घृण हत्या केली. अगोदर आरोपींनी या तरुणाचा गळा आवळला आणि त्याला मृत समजून फेकून दिले. काही तासानंतर तो जिवंतच असल्याचं लक्षात आल्यावर आरोपींनी त्या तरुणाचा गळा चिरला आणि तेथून निघून गेले. काही वेळाने ते […]
यवतमाळ हादरले! एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या
यवतमाळ : पुसद तालुक्यातील धनसळ गावात रामपूरनगर येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी ९.30 वाजताच्या सुमारास घडली. सुवर्णा अर्जुन चव्हाण (२१) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून आकाश श्रीराम आडे (२५) असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही एकाच गावात राहत होते. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. […]
धक्कादायक : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली आणि अनर्थ घडला..
मुंबई : वांद्रे पश्चिम परिसरात असलेल्या बँडस्टँड भागात एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही तरुणी आपल्या सोबत बँडस्टँड येथे फिरायला गेली असता ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी या तरुणीच्या बॉयफ्रेण्डसह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ११ मे रोजी रात्री बॉयफ्रेंडसोबत वांद्रे पश्चिम येथील […]
चोरीच्या उद्देशानं घरात घुसले, विलगीकरणात असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार
इंदौर : चोरीच्या उद्देशानं घरात घुसलेल्या नराधमांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तीन नराधमांनी चाकूचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार केला. कोरोनाची लागण झाल्यामुळे ही महिला विलगीकरणात राहत होती. नराधमांनी 50 हजार रुपये आणि मोबाईल तर चोरलाच पण या महिलेवर सामूहिक बलात्कार देखील केला. ही घटना मध्य प्रदेशातील इंदौर येथे घडली आहे. […]
धक्कादायक : कार्यालयात घुसून मारहाण आणि खंडणीसाठी अपहरण, चार जणांना अटक
पुणे : चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी (१० मे) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका इसमाचे त्याच्या बाणेरमधील कार्यालयात जाऊन चार जणांनी खंडणीसाठी अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी या इसमाकडे असणारा मोबाईल, अंगठी, घड्याळ आणि एटीएम कार्ड काढून घेऊन 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चार जणांनी सदर इसमाला […]
कारागृहातच गँगस्टरने केले दोन खून, त्यानंतर एन्काऊंटरमध्ये झाला ठार
उत्तर प्रदेश : कारागृहात झालेल्या गोळीबारात दोन कैद्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातल्या चित्रकूट कारागृहात ही घटना घडली. या गोळीबारात मृत्युमुखी पडलेला एक गुन्हेगार हा बाहुबली विधायक मुख्तार अन्सारी यांचा खास माणूस होता, तर दुसरा गँगस्टर असल्याचं सांगण्यात य़ेत आहे. वृत्तानुसार, पूर्वांचलचा कुप्रसिद्ध गँगस्टर अंशु दीक्षित याला नुकतंच सुल्तानपूर कारागृहातून चित्रकूट कारागृहामध्ये हलविण्यात […]










