Taxi Driver Died In Fruit Seller Attack In Dadar Market
क्राईम महाराष्ट्र मुंबई

खळबळजनक! किरकोळ कारणावरून फळविक्रेत्याने केली टॅक्सीचालकाची निर्घृण हत्या

मुंबई : फळविक्रेत्याने डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून टॅक्सीचालकाची हत्या केल्याची घटना आज दादरच्या गजबजलेल्या परिसरात घडली. छबीलाल जैस्वार (५५) असे मृत टॅक्सीचालकाचे नाव आहे. दादर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून काही तासांतच आरोपी बसवराज मेलिणामनी (३०) याला अटक केली आहे. टॅक्सीचालकाने जवळचे भाडे नाकारले, त्यामुळे संतापलेल्या फळविक्रेत्याने रागाच्या भरात हे भयानक कृत्य केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, दादर मार्केटमधील कबुतरखाना येथे सकाळी ६ वाजताच्या सुमारास छबीलाल जैस्वार टॅक्सी घेऊन आला. यावेळी बसवराज हा फळविक्रेता तिथे आला आणि तो छबीलाल याला जवळच जायचे आहे असे म्हणाला. मात्र, जवळचे भाडे असल्याने छबीलाल याने जाण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यामुळे बसवराज याने रागाच्या भरात जवळच पडलेला सिमेंटचा पेव्हर ब्लॉक उचलला आणि छबीलाल याच्या डोक्यात मारला. त्यामुळे छबीलाल याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गजबजलेल्या भागात घडल्याने खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच दादर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मृत्यूंजय हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक महेश थिटे यांच्यासह संतोष पाटणे, अजित महाडीक, महेश कोलते, रावराणे यांच्या पथकाने तपास सुरु केला. त्यांनी प्रत्यक्षदर्शीकडून माहीती गोळा केली तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून काही तासांतच पसार झालेला आरोपी बसवराज याला बेड्या ठोकल्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत